जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद

वाशिम - माता सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त संकल्प मल्टीपर्पज फाऊंडेशन, सहयोग फाऊंडेशन व राजे वाकाटक सार्वजनिक वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने रविवार, ५ जानेवारी रोजी स्थानिक राजे वाकाटक वाचनालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय निशुल्क वक्तृ त्व स्पर्धेला उदंड प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत संपूर्ण जिल्ह्यातून तब्बल ५१ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. क । य क मा च्या अध्यक्षस्थानी राजे वाकाटक सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष माधवराव शेवलकर हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून अॅड. उमेद खंडेलवाल, नगरसेवक अमित मानकर, नगरसेविका कांचनताई मोहळे, महिला पतंजली योग समितीच्या जिल्हाध्यक्षा दिपाताई वानखेडे, सोनाली गर्जे, समाजसेवक राजाभैया पवार, उद्योजक रामभाऊ सांगळे, मनोज परिहार, मनोज देवकर, सुरज इंगळे, अँड. सुरेश टेकाळे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात माता सावित्रीबाई फुले, माँ जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमा पुजनाने व माता सरस्वतीच्या मुर्तीपुजनाने करण्यात आली. वक्तृत्व स्पर्धेला परिक्षक म्हणून श्रीनिवास व्यास, प्रा. यास्मीन शेख, कांतीलाल पाटील व बंड गव्हाणे यांनी काम पाहीले. ___ या वकृत्व स्पर्धेतील विषयामध्ये माता सावित्रीबाई फुले, माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद असे बक्षीसामध्ये श्रीकांत रसुलकर व विषय ठेवण्यात आले होते. विजेत्या वैष्णवी नप्ते यांनी पटकावले. तब्बल स्पर्धकांसाठी विविध बक्षीसे ठेवण्यात पाच तास चाललेल्या स्पर्धेत सहभागी आली होती. या स्पर्धेमध्ये तीन हजार स्पर्धकांनी एकापेक्षा एक एक रुपयाचे प्रथम पारितोषीक वक्तृ त्वकलेचे प्रदर्शन करीत अविनाश सोनोने या विद्यार्थ्याने उपस्थितांची दाद मिळविली. सर्व पटकावले. तर दोन हजार एक रुपयाचे विजयी स्पर्धकांना आयोजकांच्या व्दितीय पारितोषीक ऋषांत कोरान्ने, वतीने व मान्यवरांच्या हस्ते एक हजार एक रुपयाचे तृतीय बक्षीस सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, ॲड. सुरेश कु. पार्वती व्यवहारे या विद्यार्थीनीने टेकाळे यांच्या वतीने दिनदर्शिका व पटकावले. पाण्याची बाटली भेट देण्यात आली. याशिवाय पाचशे याशिवाय सहभागी स्पर्धकांना सहभाग रुपयाच्या दोन प्रोत्साहनपर प्रमाणपत्र देण्यात आले. आयोजित के लेल्या या सामाजीक कार्यक्रमाबद्दल समाजसेवक राजाभैया पवार यांच्या वतीने संकल्प संस्थेला माता सावित्रीबाई फुले, माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची प्रतिमा भेट देण्यात आली. क । य क मा च्या यशस्वीतेकरीता संकल्प मल्टीपर्पज फाऊंडेशनचे अध्यक्ष सुशील भिमजीयाणी, सहयोग फाऊंडेशनचे अध्यक्ष सौ. संगीता वसंत इंगोले, राजे वाकाटक सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल संतोष काळमुंदळे, गणेश पाठक, रवि गुप्ता, दिलीप बरेटीया, दर्शना ढोके, ज्योती इंगळे, महादेव भिसे, बंटी मुंदडा, वसंता जाधव, हिरवे पाटील, विष्णू इंगळे, ज्ञानेश्वर सुरुशे आदींनी अथक परिश्रम घेतले. सुत्रसंचालन व आभार सुशील भिमजीयाणी यांनी मानले. कार्यक्रमाला युवक युवती व पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


Popular posts
यूपीआय, भीम अॅपद्वारे हाेणाऱ्या व्यवहारात मार्चमध्ये 16 हजार काेटींनी घट
मोदींच्या दिवे लावण्याच्या अपीलनंतर ममता म्हणाल्या - माझ्यासाठी व्हायरसशी लढणे जास्त महत्वाचे, यावरून राजकीय युद्ध सुरु करू नका
गाझियाबादच्या हॉस्पीटलमध्ये जमाती रुग्णांकडून गैरवर्तन, आरोपींवर एनएसए कायदा लावण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
कोरोनाशी लढा / पंतप्रधान मोदींनी सर्व मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधला संवाद, कोरोनाशी लढण्याच्या रणनीतींवर झाली चर्चा
देशात कोरोना / आतापर्यंत 3 हजार 765 प्रकरणे तर 75 जणांचा मृत्यू; 2 दिवसात 770 पेक्षा अधिकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला