संस्कृतीचे नित्य वर्तमान

लोकसाहित्य म्हटले की- सनातन, पुरातन, इतिहासजमा झालेले, | समकालिनत्वाच्या विरोधी किंबहुना विसंवादी, अप्रगत, खेडुतांचे, | अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे, जातिव्यवस्थेच्या उतरंडीचे समर्थन करणारे असे अनेक समज-गैरसमज रूढ झालेले आहेत. मात्र मानवशास्त्रची अतिशय महत्त्वाची शाखा असलेले लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती हा जनलोकांचा प्राण, जनलोकांचा श्वास असल्याचे प्रतिपादन डॉ. दुर्गा भागवत, चिं. ग. कर्वे, डॉ. रा. चिं. ढेरे, डॉ. सरोजिनी बाबर, डॉ. प्रभाकर मांडे, डॉ. तारा भवाळकर, डॉ. गंगाधर मोरजे यांच्यासह अगदी अलीकडच्या पिढीतील तरूण लोकसाहित्य अभ्यासकांनी केले आहे. डॉ सरोजिनी बाबर यांच्या लोकसाहित्य क्षेत्रातील संकलन, संपादनाचा आढावा घेता घेता लोकसाहित्याची धार आणि काठ यांचा संक्षेपात धांडोळा घेण्याचा प्रयत्न पुण्यातल्या लोकसाहित्य संमेलनाच्या निमित्ताने समर्पक ठरतो. _ वि. का. राजवाडे, श्रीधर व्यंकटेश केतकरांपासून लोकसाहित्याविषयीचे कुतूहल चाळवले गेले. लोकसाहित्याचा अभ्यास पाश्चात्य संशोधकांनी सुरू केला तो मानववंश शास्त्राच्या छत्रखाली. लोककथा, लोकगीते, संकलित पोवाडे अशा प्राथमिक स्वरूपात आपण लोकसाहित्याचा विचार केला तो संकलन, संपादनाच्या रूपात. डॉ. दुर्गा भागवत यांनी 'लोकसाहित्याची रूपरेखा' या मौलिक ग्रंथाच्या रूपाने आपल्याकडे लोकसाहित्य शास्त्रपूत केले. त्याला सैद्धांतिक बैठक प्राप्त करून दिली. शास्त्र-काट्यावर लोकसाहित्य एका बाजूला तोलले जात असतानाच लोकसाहित्य, लोकसंस्कृती, क्लदैवते, जानपद आविष्कार, लोककला यांच्या संकलनाची, संपादनाची मोठी चळवळ महाराष्ट्रात उभी राहिली. संकलन, संपादनाचे जाणतेपण आणि शास्त्रकाट्यावरील नेणतेपणा असा कृष्णा-कोयना संगम महाराष्ट्राच्या साहित्य-संस्कृती विश्वात पाहायला मिळाला. डॉ. सरोजिनी बाबर या कृष्णा-कोयना संगमाच्या काठावरची बहरलेली रानजाई होती, असे म्हटले तर त्यात अतिशयोक्ती ठरू नये. महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने डॉ. सरोजिनी बाबर यांनी लोकसाहित्याच्या | क्षेत्रात मौलिक संपादित ग्रंथाची मालिकाच निर्माण केली. गावी एक वासदेव पहाटे फेरी मारताना आणि दिवस वर येताच वासुदेवाची मोरपिसाची टोपी काढून, अंगरखा काढून पॅट-शर्ट घालून स्टो-रिपेरिंगची पेटी खांद्यावर अडकवून नव्याने गाव फेरीला निघालेला पाहिला. या परिवर्तनाचा आपण कसा अर्थ लावणार? त्याचे लोकसंस्कृतीचा उपासक, लोकप्रोहित हे रूप स्वीकारतानाच त्याच्या बदलत्या भावविश्वाचा विचार, याचा अभ्यास हे आजच्या लोकसाहित्याच्या अभ्यासकांपुढचे मोठे आव्हान आहे. समष्टीच्या झंडी झाल्या. समाजाचे मंडळीकरण, कवट थांबली. व्यक्तिकेंद्री समाजाचे आविष्कार बाजारू झाले. या सर्वांचा वेध आज लोकसाहित्य अभ्यासक घेणार का?


Popular posts
यूपीआय, भीम अॅपद्वारे हाेणाऱ्या व्यवहारात मार्चमध्ये 16 हजार काेटींनी घट
मोदींच्या दिवे लावण्याच्या अपीलनंतर ममता म्हणाल्या - माझ्यासाठी व्हायरसशी लढणे जास्त महत्वाचे, यावरून राजकीय युद्ध सुरु करू नका
गाझियाबादच्या हॉस्पीटलमध्ये जमाती रुग्णांकडून गैरवर्तन, आरोपींवर एनएसए कायदा लावण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
कोरोनाशी लढा / पंतप्रधान मोदींनी सर्व मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधला संवाद, कोरोनाशी लढण्याच्या रणनीतींवर झाली चर्चा
देशात कोरोना / आतापर्यंत 3 हजार 765 प्रकरणे तर 75 जणांचा मृत्यू; 2 दिवसात 770 पेक्षा अधिकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला