गाझियाबाद. यूपी सरकारने गाझियाबादच्या जिल्हा हॉस्पीटलमध्ये झालेल्या घटनेनंतर आरोपींवर रासुका (NSA)लावण्याचे आदेश दिले आहेत. हॉस्पीटलमधील जमाती रुग्णांवर रुग्णालय परिसरात विना पँट नग्न फिरणे, नर्सेची छेड काठणे आणि अश्लील इशारे करणे आणि हॉस्पीटल स्टापकडे बीडी-सीगारेट मागण्यासारखे गंभीर आरोप आहेत. मुख्य चिकित्सा अधिकाऱ्याने डीएम, एसएसपी आणि स्थानीक पोलिसांना याची लेखी तक्रार दिली. यानंतर यूपी सरकारने हा मोठा निर्णय घेतला. दिल्लीच्या निजामुद्दीन मरकजमध्ये तब्लीगी जमातमध्ये सामील झालेल्या
नागरिकांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.
गाझियाबादच्या घटनेवर यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, ''हे लोक कायदा-सुव्यवस्थेला मानत नाहीयेत. हे मानवतेचे शत्रू आहेत. महिला कर्मचाऱ्यांसोबत गैरवर्तन करुन, त्यांनी मोठा अपराध केला आहे. त्यांच्यावर रासुका (एनएसए)लावला जावा. आम्ही त्यांना सोडणार नाहीत.''
या घटनेबाबत डॉ. रविंद्र सिंह यांनी सांगितले की, ''आमच्या सिस्टर आणि पॅरामेडिकल स्टाफने तक्रार केली की, जमातचे रुग्ण स्टाफसोबत गैरवर्तन करत आहेत. माझ्या स्टाफने माझ्याकडे दोन-तीन वेळेस तक्रार केली. त्यानंतर मी रुग्णांना समजवण्याचा प्रयत्न केला, तरीदेखील ते ऐकत नव्हते. अखेर माझ्या स्टाफने काम न करण्याचे ठरवले, त्यानंतर मी लिखीत तक्रार केली.''