नवी दिल्ली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जागतिक महामारी कोविड-१९ च्या फैलावापासून आपली भूमिका पडद्यामागून निभावत आहेत. संसदेेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यापासून ते टीव्हीवरही दिसेलेेेले नाही. यामुळे ट्विटवर व्हेअर इज अमित शहा हा हॅशटॅग ट्रेंड मध्ये होता. यामुळे २५ मार्चच्या रात्रीपासून लॉकडाऊन घोषित झाल्यापासूनच गृहमंत्री पडद्यामागे का आहेत हे भास्करने जाणून घेतले. तसेच कोविड-१९ चा सामना करण्यासाठी शहा कशाप्रकारे आपली भूमिका बजावत आहेत हेही जाणून घेतले.
शाह यांच्या जवळील सूत्रांनी सांगितले, गृहमंत्री सातत्याने अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठका घेत आहेत. २५ मार्चपासून २८ मार्चपर्यंत १२ पेक्षा जास्त बैठकींमध्ये परिस्थितीचा आढावा घेतला आहे. अर्ध सैनिक दलापासून ते अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत. गेल्या शनिवारी नॉर्थ ब्लॉगमध्ये गेले होते. मात्र गेल्या तीन दिवसापासून ते आपल्या कृष्ण मेनन मार्गावरील सरकारी निवासातच लॉकडाऊनचे पालन करत आहेत. यावेळी त्यांनी अनेक अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या आहेत.
कनिष्ठ मंत्री देताहेत आपल्या वेळेच्या स्थितीची पूर्ण माहिती
सूत्रांनुसार, मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ते सहभागी नव्हते. त्यांचे कनिष्ठ मंत्री नित्यानंद राय यांनी या बैठकीत गृह मंत्रालयाचे प्रतिनिधित्व केेले. मंत्रालयाचे दुसरे कनिष्ठ मंत्री जी किशन रेड्डीही यात सक्रिय आहेत. शहा यांनी गृह मंत्रालयात १५ प्रमुख अधिकाऱ्यांचा एक नियंंत्रण कक्ष तयार केले आहे. नित्यानंद राय आणि किशन रेड्डी आळीपाळीने नियंत्रण कक्ष सांभाळत आहेत. नियंत्रण कक्षाचे काम दिवसरात्र सुरू आहे. दोन्ही मंत्री शहा यांंना आढावा देत आहेत.